बुलढाण्यात काँग्रेसला मोठे बळ; संदीप शेळके यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश! ​प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत मुंबईत सोहळा; राजर्षी शाहू परिवाराचे आता काँग्रेसला समर्थन

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

मुंबई: बुलढाणा जिल्ह्यातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा ‘वन बुलढाणा मिशन’चे संकल्पक श्री. संदीप शेळके यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षाची विचारधारा स्वीकारली. मुंबई येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते त्यांनी अधिकृतरीत्या पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे मानले जात आहे.

या सोहळ्याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सचिव व तेलंगणाचे प्रभारी सचिन सावंत, प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे आणि बुलढाणा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

काँग्रेसचा विचार तळागाळात पोहोचवू: हर्षवर्धन सपकाळ

संदीप शेळके यांचे पक्षात स्वागत करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “संदीप शेळके यांच्यासारखे युवा नेतृत्व पक्षात आल्याने काँग्रेसची विचारधारा तळागाळातील सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यास मोठी मदत होईल,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणे

संदीप शेळके यांनी ‘वन बुलढाणा मिशन’च्या माध्यमातून जिल्ह्यात मोठे जाळे निर्माण केले आहे. त्यांच्यासोबत आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांमुळे जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संदीप शेळके यांनी काँग्रेसच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून जनसेवेचा हा नवा प्रवास सुरू केल्याचे यावेळी सांगितले.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!