बुलढाणा जिल्ह्यात या तारखेला हज यात्रेकरूंसाठी लसीकरण कॅम्प; जिल्हा हज कमिटीचे नियोजन

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा: हज यात्रा २०२६ साठी निवड झालेल्या यात्रेकरूंच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘दिमागी ताप’ (मेनिन्जायटिस) प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयोजन जिल्हा हज कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. २९ आणि ३० जानेवारी रोजी जिल्हयातील दोन प्रमुख ठिकाणी हे लसीकरण पार पडणार आहे.

लसीकरणाचे वेळापत्रक: जिल्हा हज ट्रेनर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेचा पहिला कॅम्प २९ जानेवारी २०२६ रोजी खामगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ३० जानेवारी २०२६ रोजी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (सरकारी दवाखाना) लसीकरण केले जाईल. बुलढाणा येथील कॅम्पची वेळ सकाळी ९:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

यात्रेकरूंसाठी जेवणाची व्यवस्था: या लसीकरण मोहिमेसाठी येणाऱ्या हज यात्रेकरूंसाठी जेवणाची विशेष सोय करण्यात आली आहे. मरहूम अलहाज सैयद इस्माइल (बब्बू सेठ डोंगरे) यांच्या सुपुत्रांतर्फे ‘हसीना मदरसा अत्तारी’ येथे ही व्यवस्था असेल.

वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन: हज यात्रेसाठी आरोग्य प्रमाणपत्र आणि लसीकरण अनिवार्य असल्याने, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व निवडक यात्रेकरूंनी या संधीचा लाभ घ्यावा. सर्व यात्रेकरूंनी वेळेवर उपस्थित राहून आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा हज कमिटी व जिल्हा हज ट्रेनर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!