नगराध्यक्षांच्या विशेष सभेत भंगार व्यावसायिक बाबत नगरसेवकांचा ‘आवाजी’ विरोध

भंगार दुकाने चोरीच्या मालाचे अड्डे;​आ. संजय गायकवाड यांचा आरोप

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: शहरातील भंगार दुकानांमध्ये चोरीचा माल राजरोसपणे खरेदी केला जात असून, गेल्या १०-१५ वर्षांतील चोरीच्या घटनांना हेच दुकानदार जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. ‘आमच्या नाट्यगृहाचे तब्बल दोन ट्रक लोखंडही भंगारवाल्यांनीच विकत घेतले’ असे म्हणत त्यांनी या व्यवसायातील काळ्या बाजारावर बोट ठेवले. २३ जानेवारी रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष पुजाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या नगरपालिकेच्या विशेष सभे नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

-​नगराध्यक्षांच्या विशेष सभेत भंगार व्यावसायिक बाबत नगरसेवकांचा ‘आवाजी’ विरोध-

​भंगार दुकाने शहराबाहेर स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला सभागृहात मात्र तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. सत्ताधारी शिवसेना नगरसेवक निसार कुरेशी, राष्ट्रवादी (शरद पवार गट) नगरसेवक अनिल वर्मा आणि अपक्ष नगरसेवक विनोद बेडवाल यांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला. या विरोधामुळे ३१ नगरसेवकांच्या बहुमतांपैकी ३ नगरसेवकांनी मात्र आपला विरोध दर्शविला.

-भंगार व्यवसाय शिस्तबद्ध असणे गरजेचे-आ.गायकवाड-

​पत्रकार परिषदेत बोलताना आ. गायकवाड म्हणाले की, “शहरात गेल्या दशकात चोरीला गेलेल्या दुचाकी, सायकली, शेतातील पाण्याच्या मोटारी, लोखंडी गेट आणि अगदी शासकीय लोखंडही याच भंगार बाजारात विकले गेले आहे. आमच्या नाट्यगृहाचे तब्बल दोन ट्रक लोखंड या लोकांनी विकत घेतले. चोरीचा कोणताही माल असो, तो या भंगार दुकानांमध्ये सहज खपवला जातो.”

नियम धाब्यावर; रस्तेही जाम

​आमदारांनी केवळ चोरीचाच नाही, तर अनधिकृत व्यवसायाचा मुद्दाही उपस्थित केला. “या भंगारवाल्यांकडे नगरपालिकेचे परवाने नाहीत, शॉप ॲक्ट लायसन्स नाही. भरस्त्यात भंगार टाकून रस्ते जाम केले जातात. आम्हाला कोणावर अन्याय करायचा नाही, पण हे व्यवसाय शिस्तबद्ध असणे गरजेचे आहे. म्हणूनच ही सर्व दुकाने शहराबाहेर एकाच रांगेत हलवण्याचा आमचा विचार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!