बुलढाणा जिल्हा बँक निवडणुकीत तीन निकाल जाहीर; सहकारचे उदयकार, मारोडे तर शेतकरी पॅनलचे तायडे विजयी

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज सहकार विद्या मंदिरच्या हॉलमध्ये सुरू असून, मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात तीन महत्त्वाचे निकाल लोकप्रिय मराठी न्युजच्या हाती आले आहेत. यामध्ये मोताळा मतदारसंघातून सहकार पॅनलचे सुनील उदयकार, संग्रामपूरमधून श्रीकांत दादाराव मारोडे, तर मलकापूरमधून स्वर्गीय अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनलचे शिवा तायडे विजयी झाले आहेत.

मोताळा मतदारसंघातून सुनील उदयकार यांना १९ मते मिळाली. त्यांनी संतोष रायपूरे यांचा पराभव केला. संग्रामपूर मतदारसंघातून सहकार पॅनलचे श्रीकांत दादाराव मारोडे यांनी १८ मते मिळवत विजय मिळवला.

दरम्यान, मलकापूर मतदारसंघातून शेतकरी परिवर्तन पॅनलचे शिवा तायडे यांनी १८ मते मिळवत विजय संपादन केला.

या निकालामुळे सहकार पॅनलला दोन जागांवर, तर शेतकरी परिवर्तन पॅनलला एका जागेवर यश मिळाले आहे. जिल्हा बँक निवडणुकीतील उर्वरित जागांसाठी मतमोजणी सुरू असून, आणखी कोणाच्या विजयाचा गुलाल उधळला जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!