बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी सत्ताधारी आमदार-खासदारांच्या घरासमोर उद्या काँग्रेसचा ‘बैठा सत्याग्रह’

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

​बुलढाणा: जिल्ह्यातील बिकट परिस्थिती लक्षात घेऊन बुलढाणा जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवार, १६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व सत्ताधारी आमदार आणि खासदारांच्या घरासमोर अथवा कार्यालयांसमोर एक तासाचा ‘बैठा सत्याग्रह’ आंदोलन छेडण्यात येणार आहे. हे आंदोलन दुपारी १२ ते १ या वेळेत पार पडेल, अशी माहिती काँग्रेसचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिली आहे.

​जिल्ह्यात निर्माण झालेल्या टंचाईसदृश परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र, सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत काँग्रेसने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत एकाच वेळी सत्ताधारी आमदार आणि खासदारांच्या घरासमोर शांततापूर्ण मार्गाने हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

​या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला आवाज बुलंद करावा, असे जाहीर आवाहन जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केले आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!