आमदार श्वेता महाले यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन; ​चिखलीतील दुष्काळी स्थितीवर सविस्तर चर्चा; तातडीने उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

​मुंबई: चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील आणि मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाप्पाची विधिवत पूजा व आरती करत राज्यातील जनतेच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.

​दर्शनानंतर मुख्यमंत्र्यांनी आमदार श्वेता महाले आणि विद्याधर महाले यांच्यासोबत चिखली मतदारसंघातील सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा केली. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे मतदारसंघात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांसमोर उभे ठाकलेले संकट, पिकांची स्थिती आणि पाणीटंचाई याविषयी आमदार महाले यांनी मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थितीची माहिती दिली.

​शेतकऱ्यांना व नागरिकांना या संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाने तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी आमदार श्वेता महाले यांनी यावेळी केली. या मागणीची मुख्यमंत्र्यांनी तातडीने गंभीर दखल घेतली. मतदारसंघातील परिस्थितीवर सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती सर्व शासकीय कार्यवाही आणि मदत लवकरात लवकर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

​या प्रसंगी आमदार श्वेता महाले पाटील आणि विद्याधर महाले यांचे सुपुत्र राजन्य महाले हेदेखील उपस्थित होते.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!