गजनफरउल्ला खान यांची बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी निवड

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

​बुलढाणा: स्थानिक राजकारणातील अभ्यासू आणि जनमानसात लोकप्रिय असलेले देऊळघाटचे माजी सरपंच गजनफरउल्ला खान यांची बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

​गजनफरउल्ला खान यांनी आजवर देऊळघाट गावाच्या तसेच परिसराच्या विकासासाठी भरीव कार्य केले आहे. त्यांची सर्वसमावेशक कार्यपद्धती आणि काँग्रेस पक्षाप्रती असलेली प्रदीर्घ निष्ठा लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या संघटन कौशल्याचा आणि राजकीय अनुभवाचा फायदा पक्षाला आगामी काळात अधिक बळकटी देण्यासाठी होईल, असा विश्वास काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

गजनफरउल्ला ​खान यांच्या निवडीचे वृत्त जाहीर होताच देऊळघाटसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, समर्थक आणि काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले असून पुढील भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!