जड वाहनात अडकली विद्युत केबल; संगम चौकातील सिग्नल तुटला, स्ट्रीट लाईटचा खांब वाकला; ​सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा: शहरातील अत्यंत वर्दळीच्या संगम चौक परिसरामध्ये एका जड वाहनात जाहिरातींच्या डिजिटल स्क्रीनचा विद्युत केबल अडकल्याने मोठा अपघात घडता घडता टळला. या घटनेत डिवायडर वरील स्ट्रीट लाईटचा पोल वाकला असून वाहतूक नियंत्रण सिग्नलचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना रात्री साधारण साडेसात वाजता घडली.

​मिळालेल्या माहितीनुसार, संगम चौकातील डिवायडरवर जाहिरातींच्या डिजिटल स्क्रीनसाठी वापरण्यात आलेली इलेक्ट्रिक अरमाड केबल रस्त्यावरून जाणाऱ्या एका जड वाहनात अचानक अडकली. वाहनाच्या ओढ्यामुळे दुभाजकावर बसवलेला स्ट्रीट लाईटचा लोखंडी खांब जोरदार ताणाने वाकला, तर लगतचा सिग्नलही तुटला आहे.केबल तुटल्याने हा विद्युत केबल रस्त्यावर लोंबकळत पडली होती.

मोठ्या आवाजाने उडाली खळबळ

केबल अडकून खांब वाकताना आणि सिग्नल तुटताना मोठा आवाज झाला. अचानक झालेल्या आवाजामुळे परिसरातील नागरिक, व्यावसायिक आणि वाहनधारकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी तसेच नगर परिषदेच्या विद्युत विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी तात्काळ रस्त्यावर तुटून पडलेली विद्युत केबल सुरक्षितरीत्या बाजूला करून वाहतुकीस होणारा अडथळा दूर केला.

​दरम्यान, ज्या जड वाहनामुळे ही दुर्घटना घडली, ते वाहन शोधण्यासाठी पोलीस प्रशासन संगम चौक व परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी करत आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!