बुलढाणेकरांसाठी आनंदाची बातमी: ‘स्व. भोंडे जलाशय’ ९० टक्के भरला; पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली!

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा: गेल्या २४ तासांपासून शहर आणि परिसरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे बुलढाणेकरांसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य स्त्रोत असलेला स्व. भोंडे जलाशय (येळगाव धरण) तब्बल ९० टक्के भरला आहे. या जलसाठ्यात झालेल्या मोठ्या वाढीमुळे आगामी काळात बुलढाणा शहरावर घोंगावणारे संभाव्य पाणीसंकट टळले असून नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता आता पूर्णपणे मिटली आहे.

​कालपासून संपूर्ण बुलढाणा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सतत कोसळणाऱ्या या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली. अवघ्या एका दिवसात जलाशयाच्या पातळीत वेगाने वाढ झाली आणि धरण ९० टक्के क्षमतेने भरले.

​गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने शहरात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले होते. पालिकेला पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, कालपासून झालेल्या या सार्वत्रिक पावसाने पाण्याचा प्रश्न निकाली काढला आहे.

​धरण ९० टक्के भरल्याची माहिती मिळताच बुलढाणा शहरवासीय आणि प्रशासनात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सध्या धरणात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला असून, पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरण लवकरच १०० टक्के भरून ओसंडून वाहण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.

​पाणीसाठा मुबलक झाला असला तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून आणि काटकसरीने करावा, असे आवाहन नगरपरिषद व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!