इंधन टंचाईचा फटका? बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसांत ११३ ‘बजाज चेतक’ इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

​बुलढाणा: जागतिक स्तरावर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे सावट आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर आणि प्रवासावर पडताना दिसत आहे. इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने पेट्रोल पंपांवर तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. या जाचातून सुटका करून घेण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी आता आपला मोर्चा ‘इलेक्ट्रिक’ गाड्यांकडे वळवला असून, गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात तब्बल ११३ बजाज चेतक चार्जिंग दुचाकींची विक्रमी विक्री झाली आहे.

गुरुवार, २६ मार्च आणि शुक्रवार, २७ मार्च या अवघ्या ४८ तासांत संपूर्ण जिल्ह्यात ११३ बजाज चेतक गाड्यांची विक्री झाली आहे. यामध्ये सर्वाधिक विक्री बुलढाणा येथील मुख्य शोरूममधून झाली असून, तिथे दोन दिवसांत ६० गाड्या ग्राहकांनी खरेदी केल्या. ही माहिती शोरूमचे मॅनेजर पंकज शेजाळे यांनी ‘लोकप्रिय मराठी न्यूज’शी बोलताना दिली. केवळ या दोन दिवसांतच नव्हे, तर मार्च महिनाभरात जिल्ह्यात जवळपास ३५४ बजाज चेतक गाड्यांची विक्री झाली आहे.

पेट्रोलचे वाढते दर आणि उपलब्धता यामुळे नागरिक आता चार्जिंग गाड्यांना पसंती देत आहेत. बजाज चेतक चार्जिंग दुचाकीची किंमत १ लाख १० हजार ते १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत आहे. ही गाडी एकदा पूर्ण चार्ज केली की १०० ते १३० किलोमीटरपर्यंत धावते. विशेष म्हणजे, साडेतीन ते चार तासांत ही गाडी पूर्ण चार्ज होते आणि त्यासाठी केवळ ३ युनिट वीज लागते. ही गाडी जवळपास ७० हजार किलोमीटरपर्यंत विनासायास चालत असल्याने मध्यमवर्गीयांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरत आहे.

इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात इंधन टंचाई अधिक गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर रांगेत वेळ घालवण्यापेक्षा घरीच गाडी चार्ज करून फिरणे सोयीचे असल्याचे नागरिक सांगत आहेत. या वाढत्या प्रतिसादामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात आता इलेक्ट्रिक क्रांती अधिक वेगाने होताना दिसत आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!