रक्तदान हेच श्रेष्ठ दान; प्रसिद्ध समाजसेवक सईद ठेकेदार यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष सत्कार!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: जागतिक रक्तदान दिनाचे (१४ जून) औचित्य साधून, १५ जून रोजी दुपारी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी विभागात एका विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बुलढाणा येथील सुप्रसिद्ध समाजसेवक, रक्तदानवीर आणि कोरोना योद्धा सईद ठेकेदार यांचा त्यांच्या अतुलनीय आणि प्रेरणादायी कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

​सईद ठेकेदार यांनी आपल्या ५१ वर्षांच्या आयुष्यात आतापर्यंत तब्बल ४५ वेळा रक्तदान करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. केवळ स्वतः रक्तदान न करता, त्यांनी आजवर अनेक भव्य रक्तदान शिबिरांचे यशस्वी आयोजन करून शेकडो लोकांना जीवनदानाचे महत्त्व पटवून दिले आहे. मानव कल्याणाच्या या महान कार्यात त्यांचे हे योगदान अत्यंत अमूल्य आणि अभिमानास्पद आहे.

​निस्वार्थ समाजसेवा आणि जीवनदानाचा गौरव करणाऱ्या या सोहळ्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक ​डॉ. बिराजदार,
​डॉ. सिरसाठ (लीलावती ब्लड बँकचे संचालक) ​रक्तपेढी विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने ​या सर्व मान्यवरांच्या हस्ते सईद ठेकेदार यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

“सईद ठेकेदार यांचे कार्य तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. एका व्यक्तीने ४५ वेळा रक्तदान करणे आणि सातत्याने शिबिरे आयोजित करणे ही समाजाप्रती असलेली त्यांची सर्वोच्च बांधिलकी दर्शवते. त्यांच्या या निस्वार्थ सेवेचा गौरव करताना आम्हा सर्वांना सार्थ अभिमान वाटत आहे.अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बिराजदार दिली.

दरम्यान ​या सत्कार सोहळ्याबद्दल बोलताना सईद ठेकेदार यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले आणि भविष्यातही हे रक्ताचे नाते आणि समाजसेवेचे व्रत अविरत सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमाला शहरातील अनेक नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!