बुलढाणेकरांसाठी सुवर्णसंधी: जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘मोफत’ गुडघा व नितंब प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शिबिर ; २४ मार्च रोजी होणार तपासणी

बुलढाणा: एकीकडे महागाई आणि आरोग्याचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना, बुलढाणा जिल्हा आणि परिसरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ममता अँड मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन, मुंबई आणि संजीवनी ममता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या अंतर्गत ‘मोफत मेगा गुडघा व नितंब (Knee & Hip) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे.

यापूर्वी २४ तासांत ५१२ रुग्णांची यशस्वी तपासणी करून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रस्थापित करणाऱ्या या संस्थेने आता अधिक मोठ्या प्रमाणात रुग्णांना सेवा देण्याचा संकल्प केला आहे. या शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे जगप्रसिद्ध गुडघा प्रत्यारोपण शल्य चिकित्सक डॉ. नारायण खंडेलवाल (ज्यांनी आतापर्यंत १२,००० हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत) हे रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.

२४ मार्चला बुलढाण्यात होणार तपासणी

बुलढाणा शहरातील ‘जिल्हा स्त्री रुग्णालय’ येथे मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी हे शिबिर पार पडणार आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची मोफत तपासणी केली जाईल. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे, अशांची निवड करून त्यांच्यावर मुंबईतील संजीवनी ममता हॉस्पिटल येथे पूर्णतः मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
शिबिरात मिळणाऱ्या सुविधा:
​तज्ज्ञ ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडून मोफत सल्ला व तपासणी.
​शिबिरामध्ये मोफत एक्स-रे (X-Ray) सुविधा.
​सर्व रुग्णांना औषधींचे विनामूल्य वाटप.
​गुडघा आणि नितंब दुखणे, चालताना किंवा जिने चढताना होणारा त्रास यावर विशेष उपचार.

रुग्णांनी येताना आपले जुने एक्स-रे किंवा वैद्यकीय अहवाल सोबत आणण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विठ्ठल वसु (९७६५५५२२०४), निलेश बाजड (९७६७१५१००७), आवेश खान (९५०३६३१३२०) किंवा विनोद मोरे (७६६६९७९३८१) यांच्याशी संपर्क साधावा.
​आपले आरोग्य हीच आमची प्राथमिकता असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन’च्या वतीने करण्यात आले आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!