साफसफाई होत नसल्यावरून अपक्ष नगरसेवकाचा संताप! बुलढाणा नगर परिषदेत खळबळ:

सत्ताधारी गटात असूनही विनोद बेंडवाल यांची अधिकाऱ्यांवर आगपाखड; 'तळ ठोकून' बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: बुलढाणा नगर परिषदेत एकहाती सत्ता असतानाही शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रभागातील साफसफाई होत नसल्याच्या कारणावरून माजी उपनगराध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक १३ चे अपक्ष नगरसेवक विनोद बेंडवाल यांनी आज, मंगळवार १७ मार्च रोजी नगर परिषद प्रशासनाला धारेवर धरले. “सत्ताधारी गटात असूनही जर ही परिस्थिती असेल, तर सामान्य जनतेचे काय?” असा संतप्त सवाल करत त्यांनी मुख्याधिकारी आणि आरोग्य विभागाच्या दालनात आपला संताप व्यक्त केला.

आज मंगळवारी १७ मार्च रोजी दुपारी पावणे बारा वाजेच्या सुमारास नगरसेवक विनोद बेंडवाल यांनी थेट नगर परिषद कार्यालय गाठले. यावेळी त्यांनी मुख्याधिकारी गणेश पांडे व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे प्रभागातील कचरा आणि स्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “प्रभागात साफसफाई होत नाही, नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत, तरीही प्रशासन ढिम्म का?” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

​अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ‘तळ’ ठोकण्यावर प्रश्नचिन्ह

यावेळी बेंडवाल यांनी प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटींवर बोट ठेवले. नगर परिषदेत अनेक अधिकारी आणि कर्मचारी गेल्या ५ ते ७ वर्षांपासून एकाच जागी ठाण मांडून बसले आहेत. त्यामध्ये कॅडरचे देखील अधिकाऱ्याचा समावेश आहे, “हे कर्मचारी आणि अधिकारी कोणालाही जुमानत नाहीत, त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. नियमानुसार त्यांच्या बदल्या का केल्या जात नाहीत?” असा रोकडा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. अनेक वर्षांपासून एकाच पदावर राहिल्यामुळे प्रशासकीय कामात शिथिलता आल्याचा आरोपही त्यांनी केला.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!