सायबर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: हॅकर्सच्या तावडीतून शेतकऱ्याचे ८.५७ लाख रुपये परत मिळवले!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: मोबाईल हॅक करून देऊळगाव राजा येथील एका शेतकऱ्याची तब्बल १० लाख ५१ हजार ६०२ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीला बुलढाणा सायबर पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. पोलिसांनी अत्यंत वेगाने तांत्रिक तपास करत फसवणूक झालेल्या रकमेपैकी ९ लाख ५५ हजार रुपये फ्रीज (होल्ड) केले आणि त्यातील ८ लाख ५७ हजार ४७० रुपये न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदाराच्या बँक खात्यात यशस्वीरित्या परत जमा केले आहेत.

अज्ञात APK फाईल ठरली घातक

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा येथील शनिवार पेठेत राहणारे सचिन विनायक जपे (वय ४५, व्यवसाय: शेती) यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने एक प्रलोभन दाखवणारी किंवा संशयास्पद ‘APK’ (अँड्रॉइड ॲप्लिकेशन) फाईल पाठवली होती. तक्रारदाराने ती फाईल डाऊनलोड करताच, सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलचा ताबा घेतला.

​हॅकर्सनी जपे यांच्या मोबाईलवरील सर्व SMS दुसऱ्या क्रमांकांवर फॉरवर्ड केले. यामुळे बँकेचे आलेले OTP (वन टाईम पासवर्ड) हॅकर्सना मिळाले. यानंतर दि. २३ फेब्रुवारी २०२६ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान हॅकर्सनी त्यांच्या बँक खात्यातून १०,५१,६०२ रुपये वेगवेगळ्या खात्यांवर ट्रान्सफर करून ऑनलाइन गंडा घातला.

​-पोलिसांचा तात्काळ ॲक्शन प्लॅन-

​फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सचिन जपे यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ७ एप्रिल २०२६ रोजी सायबर पोलीस स्टेशन, बुलढाणा येथे गुन्हा रजि. नं. ०८/२०२६, कलम ३१८(४) भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ सहकलम ६६(C)(D) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये (IT Act) गुन्हा दाखल करण्यात आला.

​गुन्हा दाखल होताच सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी तांत्रिक विश्लेषण सुरू केले. ज्या ज्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर झाले होते, त्या सर्व बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांशी तातडीने पत्रव्यवहार केला. पोलिसांच्या तत्परतेमुळे फसवणूक झालेल्या रकमेतील ९ लाख ५५ हजार रुपये तातडीने होल्ड करण्यात आले.

-​अॅक्सिस बँकेतून पैसे परत-

होल्ड केलेल्या रकमेपैकी ८,५७,४७० रुपये हे उत्तर प्रदेशातील नोएडा येथील ॲक्सिस बँकेच्या शाखेत अडकले होते. पोलिसांनी न्यायालयात पाठपुरावा करून कायदेशीर आदेश मिळवले आणि ही पूर्ण रक्कम तक्रारदार सचिन जपे यांच्या खात्यात परत जमा केली. उर्वरित रक्कमही परत मिळवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया आणि आरोपींचा शोध सुरू आहे.

​ही यशस्वी कामगिरी बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक  अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी पो.नि. संग्राम पाटील, सपोनि प्रमोद इंगळे, पोहेकॉ रामू मुंढे, भारत जंगले, केशव घुबे, प्रशांत गावंडे आणि पंकज मेहेर यांच्या तपास पथकाने केली.

​-पोलीस अधीक्षकांचे नागरिकांना जाहीर आवाहन-

​बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे (IPS) यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्यासाठी खालील महत्त्वाचे आवाहन केले आहे:

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!