बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख उंचावला! ‘सर कटी लाश’ ते सरपंच आत्महत्या प्रकरणाचे सावट; आज आयजींच्या क्राईम मीटिंगमध्ये होणार का झाडाझडती?

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या गंभीर गुन्हेगारी घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः घाटाखालील भागात गुन्हेगारीने कळस गाठला असून, आज अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IGP) डॉ. महेश पाटील यांच्या उपस्थितीत बुलढाण्यात पार पडणाऱ्या क्राईम बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. वाढत्या गुन्हेगारीवरून आयजी जिल्हा पोलीस दलाला जाब विचारणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

‘सर कटी लाश’चे गूढ कायम: जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या आणि थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेल्या ‘सर कटी लाश’ प्रकरणातील मृतदेहाची ओळख पटवण्यात आणि आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.​

अवैध धंदे व राजकीय कनेक्शन: खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेलोदरोड्यादरम्यान वृद्धाचा मृत्यू: मलकापूर तालुक्यातील काटी गावात दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत रायसिंग सिताराम सोळंकी या वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर २४ तासांच्या आत धानोरा येथे राष्ट्रीय महामार्गावरील किराणा दुकान फोडण्यात आले.डी शिवारात देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. तसेच सत्ताधारी पक्षाच्या तालुकाप्रमुखाचा जुगार अड्डा याच भागात चालत असल्याचे पोलीस कारवाईत उघड झाले.

LPG गॅस चोरीचे रॅकेट: खामगाव-मलकापूर मार्गावर एलपीजी गॅसची अवैध चोरी करून काळाबाजार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.

दरोड्यादरम्यान वृद्धाचा मृत्यू: मलकापूर तालुक्यातील काटी गावात दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत रायसिंग सिताराम सोळंकी या वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर २४ तासांच्या आत धानोरा येथे राष्ट्रीय महामार्गावरील किराणा दुकान फोडण्यात आले.

सरपंचाची आत्महत्या व गंभीर आरोप: संग्रामपूर तालुक्यातील करमोडा येथील लोकनियुक्त सरपंच दीपक उगले यांनी विरोधकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी विरोधक वैभव पाटील यांच्यावर शेतात जुगार अड्डा चालवत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

बुलढाणा ​जिल्ह्यात चोरी, दरोडे, अवैध धंदे आणि हत्येपर्यंत पोहोचलेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या क्राईम आढावा बैठकीत अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IGP) डॉ. महेश पाटील हे जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतात का? आणि कायदा-सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी काय कडक सूचना देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!