उपवासाची ‘भगर’ बेतू शकते जिवावर! अस्परजिलस बुरशीमुळे अन्न विषबाधेचा धोका; आरोग्य प्रशासनाचे नागरिकांना व विक्रेत्यांना महत्त्वाचे आवाहन..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: महाराष्ट्रात तसेच बुलढाणा जिल्ह्यात उपवासाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भगरीचे (वरई) सेवन केले जाते. मात्र, चुकीच्या पद्धतीने साठवलेली किंवा बुरशीयुक्त भगर खाल्ल्यामुळे तीव्र अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा आरोग्य प्रशासनाने नागरिक आणि भगर विक्रेत्यांसाठी तातडीची नियमावली व सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भगरीवर ‘अस्परजिलस’ नावाच्या बुरशीचा प्रादुर्भाव वेगाने होतो. दमट हवामान या बुरशीच्या वाढीसाठी अत्यंत अनुकूल असते. या बुरशीमुळे भगरीमध्ये ‘फ्युमिगाक्लेविन’ नावाचे घातक विषद्रव्य (Toxin) तयार होते. अशी दूषित भगर किंवा तिचे पीठ पोटात गेल्यास मळमळ, उलटी, पोटदुखी आणि विषबाधेचे गंभीर लक्षणे दिसून येतात.
नागरिकांनी भगर खाताना ही काळजी घ्यावी:
पाकीटबंद भगरच खरेदी करा: ब्रँड किंवा लेबल नसलेली, सुटी भगर अथवा तिचे पीठ खरेदी करणे टाळा. खरेदी करताना पाकीटवरील पॅकिंग दिनांक आणि Expiry Date आवर्जून तपासा.
योग्य साठवणूक: भगर नेहमी कोरड्या व हवाबंद डब्यात ठेवावी, जेणेकरून वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशी लागणार नाही. जास्त दिवस साठवलेली जुनी भगर खाऊ नये.
पिठाऐवजी खिचडीला पसंती द्या: भगरीच्या पिठात ओलावा शोषून घेण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे पिठाला बुरशी लागण्याचा धोका अधिक असतो. यास्तव भगरीच्या भाकरी किंवा दशम्यांऐवजी खिचडी बनवून खावी. पीठ हवे असल्यास घरीच आवश्यकतेनुसार दळावे.
प्रमाणाचा भान ठेवा: भगर आणि शेंगदाणे प्रथिनयुक्त असतात. सलग उपवा२. भगरीच्या पाकीटावर किंवा पोत्यावर उत्पादकाचा पूर्ण पत्ता, FSSAI परवाना क्रमांक, पॅकिंग व अंतिम वापर दिनांक असणे बंधनकारक आहे.सात यांचे अतिसेवन केल्यास ॲसिडीटी, मळमळ व पोटाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे पचनशक्तीनुसार मर्यादित सेवन करावे.
-विक्रेत्यांसाठी कडक सूचना व प्रशासनाचा इशारा-
१. विक्रेत्यांनी केवळ पॅकबंद भगरीचीच विक्री करावी आणि घाऊक विक्रेत्यांकडून खरेदीची पावती सुरक्षित ठेवावी.
२. भगरीच्या पाकीटावर किंवा पोत्यावर उत्पादकाचा पूर्ण पत्ता, FSSAI परवाना क्रमांक, पॅकिंग व अंतिम वापर दिनांक असणे बंधनकारक आहे.
३. मुदतबाह्य म्हणजे Expired भगर किंवा उघड्यावरील सुट्या पिठाची विक्री करू नये.
“अन्न व औषध प्रशासनातर्फे जिल्ह्यातील भगर विक्रेत्यांच्या दुकानांची कडक तपासणी सुरू करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६’ अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. असा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले आणि जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे यांनी दिला आहे.




