बुलडाणा जिल्ह्याच्या नूतन उपवनसंरक्षक पदी जमीर शेख यांची नियुक्ती; मंगळवारी स्वीकारले पदभार

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील वनविभागाच्या रिक्त असलेल्या उपवनसंरक्षक (DFO) पदी अखेर जमीर मुनीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून रिक्त असलेल्या या महत्त्वपूर्ण पदावर मुनीर शेख यांच्या रूपाने अनुभवी अधिकारी मिळाल्याने वनविभागाच्या कामकाजाला आता नवी गती मिळण्याची चिन्हे आहेत.

जमीर शेख हे गेल्या तीन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील यावल येथे प्रादेशिक उपवनसंरक्षक म्हणून कार्यरत होते. शासकीय नियमानुसार एकाच ठिकाणी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने, त्यांची प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. राज्याच्या महसूल व वनविभागाचे विशेष कार्य अधिकारी उदय ढगे यांच्या स्वाक्षरीने २० एप्रिल रोजी या बदलीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मंगळवारी (२१ एप्रिल) सायंकाळी त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहेत.

बुलडाण्याचे उपवनसंरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सरोज गवस यांची महिनाभरापूर्वी बदली झाली होती. तेव्हापासून हे पद रिक्त असल्याने विभागातील धोरणात्मक निर्णयांवर आणि कामकाजावर परिणाम होत होता. शेख यांच्या नियुक्तीमुळे ही पोकळी भरून निघाली आहे.

-मुनीर शेख यांच्या समोर ​बुलडाण्यातील आव्हाने आणि अपेक्षा-

बुलडाणा जिल्ह्याचा सुमारे १८ टक्के भूभाग वनक्षेत्राने व्यापलेला असून, हा भाग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे नूतन डीएफओंसमोर मोठी आव्हाने असणार आहेत.
प्रामुख्याने:

अवैध वृक्षतोड रोखणे: जंगलातील मौल्यवान लाकडाची चोरी थांबवणे.

मानव-वन्यजीव संघर्ष: मेळघाट सीमेवरील गावांमध्ये वन्यप्राण्यांचा शिरकाव आणि त्यातून होणारे नुकसान टाळणे.

वनसंवर्धन: हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण मोहिमा प्रभावीपणे राबवणे.

यावलमधील कामगिरीचा अनुभव

जमीर शेख यांनी यावलमध्ये आपल्या कार्यकाळात वन संरक्षण, वृक्षारोपण आणि अवैध जंगलतोडीविरुद्ध विशेष मोहीम राबवून आपली छाप पाडली होती. त्यांच्या या अनुभवाचा फायदा आता बुलडाणा जिल्ह्यातील वनसंपदा सुरक्षित ठेवण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!