उद्या देशभरात साजरी होणार ‘ईद-उल-फित्र’; आज अवकाशात दिसले चंद्रदर्शन! ​मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: लाखो मुस्लिम बांधव ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो आनंदाचा क्षण अखेर आला आहे. आज शुक्रवारी २० मार्च रोजी सायंकाळी आकाशात रमजान ईदच्या (ईद-उल-फितर) चंद्राचे दर्शन झाले असून, उद्या शनिवारी २१ मार्च रोजी पूर्ण देशात रमजान ईद अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी केली जाणार आहे.

उपवासानंतर (रोझा), चंद्रदर्शन होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ‘ईद का चाँद मुबारक’ म्हणत शुभेच्छा दिल्या. उद्या सकाळी शहरातील मुख्य ईदगाह आणि सर्व मशिदींमध्ये सामूहिक नमाज अदा केली जाईल. देशात शांतता, समृद्धी आणि बंधुभाव नांदावा यासाठी विशेष प्रार्थना केली जाणार आहे. नमाज पठणानंतर एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देण्याची लगबग पाहायला मिळेल.

​ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत. नवीन कपडे, अत्तर, टोप्या आणि मुख्यत्वे ‘शिरखुर्मा’ बनवण्यासाठी लागणारा सुका मेवा, शेवया यांच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. बच्चेकंपनीमध्येही ईदी आणि नवीन कपड्यांमुळे मोठा उत्साह आहे.

प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

​ईदच्या निमित्ताने शहरात कुठेही वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि शांतता राखली जावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्वधर्मीय बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!