BIG BREAKING NEWS बुलढाणा शिवसेनेत ‘भावी खासदारा’चा धमाका! स्वतःच्याच पोस्टमधून माजी आ.शशिकांत खेडेकरांचा खासदारकीवर दावा; खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल;शिवसेनेत मोठी खळबळ!

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एका व्हिडिओने चांगलाच धुराळा उडवला आहे. गेल्या २० वर्षांपासून सलग चार वेळा खासदार राहिलेले आणि सध्याचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांना चक्क ‘भावी खासदार’ म्हणून संबोधणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून, यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत.ही बाब लोकप्रिय मराठी न्यूज जनतेसमोर आणत आहे..
सोशल मीडियावर व्हायरल हा व्हिडिओ स्वतः माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये खेडेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी अत्यंत गांभीर्याने चर्चा करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, या व्हिडिओवर ‘भावी खासदार’ असा मजकूर टाकण्यात आल्याने शिवसेनेत (शिंदे गट) मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात सध्या अशी चर्चा आहे की, खासदार प्रतापराव जाधव यांचा भाजप नेत्यांकडे वाढलेला वाढता ओढा आणि अंतर्गत नाराजी यामुळे शिवसेनेच्या गोटातूनच त्यांना आव्हान दिले जात आहे. स्वतःच्याच पक्षातील माजी आमदाराने ‘भावी खासदार’ म्हणून पोस्ट टाकल्याने, प्रतापराव जाधवांना आता स्वकीयांकडूनच विरोधाचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
शिवसेनेचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्या या एका पोस्टमुळे महायुतीमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे. “भावी खासदार” ही पोस्ट म्हणजे हे प्रतापराव जाधवांना दिलेले थेट चॅलेंज आहे? यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शिवसेनेत आता उघड गटबाजी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
या व्हिडिओमुळे जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे बदलणार का? आणि यावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव काय प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




