काळेगाव फाट्याजवळ बोलेरो-दुचाकीचा भीषण अपघात; बुलढाण्यातील दोन तरुणांचा मृत्यू

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा: खामगाव तालुक्यातील काळेगाव फाट्याजवळ शुक्रवारी रात्री बोलेरो गाडी आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात बुलढाण्यातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सैय्यद आदिल सैय्यद जहीर आणि शेख अरमान शेख इम्रान (दोघेही रा. जोहर नगर, बुलढाणा) अशी मृतांची नावे असून या घटनेमुळे जोहर नगर परिसरावर शोककळा पसरली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा येथील जोहर नगर परिसरातील रहिवासी असलेले सैय्यद आदिल आणि शेख अरमान हे दोघे शुक्रवारी (११ सप्टेंबर) रात्री दुचाकीने खामगावच्या दिशेने जात होते. रात्री साधारण आठ वाजेच्या सुमारास काळेगाव फाट्यानजीक त्यांच्या दुचाकीची समोरासमोर येणाऱ्या बोलेरो वाहनाशी जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा चक्काचूर झाला असून दोघेही तरुण गंभीर जखमी झाले.

​अपघातानंतर काळेगाव फाटा परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या दोघांनाही सुरुवातीला उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान दोघांचीही प्राणज्योत मालवली.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!