सूक्ष्म नियोजनाने परतापूर येथे गर्भलिंग निदान करणाऱ्या बोगस डॉक्टरांना रंगेहात पकडले; सोनोग्राफी मशीन जप्त;मेहकर तालुक्यात खळबळबळ

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: आरोग्य विभागाने पोलीस प्रशासनाने सहकाऱ्या​ने अकोला मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.सुशील वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांना एका गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अत्यंत सूक्ष्म नियोजन  करून एक विशेष कारवाई पथक (टीम) तयार करून मोठी कारवाई केली आहे. मेहकर तालुक्यातील परतापूर येथे बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करणाऱ्या एका बोगस डॉक्टरला रंगेहात पकडण्यात आले आहे. त्याच्याकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि इतर वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई आज दिनांक २७ जून २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजेच्या सुमारास करण्यात आली.

​अकोला मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.सुशील वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांना एका गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन करून एक विशेष कारवाई पथक (टीम) तयार केली.

​मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील रहिवासी असलेला अनिल रामदास सोनुने हा बोगस डॉक्टर प्रतापपूर येथील अमोल रमेश रसाळ यांच्या घरी एका महिलेचे बेकायदेशीररीत्या गर्भलिंगनिदान करत होता. आरोग्य विभागाच्या टीमने पोलिसांच्या सहकाऱ्याने योग्य वेळ साधून या घरावर अचानक छापा टाकला. यावेळी आरोपी अनिल सोनुने याला पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे लिंगनिदान करताना रंगेहात पकडण्यात आले. पथकाने तात्काळ ती मशीन आणि इतर संबंधित साहित्य जप्त केले आहे.

​या धडक कारवाईत डॉ. सुनिता हिवसे (वैद्यकीय अधीक्षक, मेहकर), ग्रामीण रुग्णालय मेहकर येथील आरोग्य टीममधील श्रीमती मंगला वायाळ (सिस्टर), प्रशांत बोरे (अधिपरिचारक) आणि शंकर वायाळ (वरिष्ठ लिपीक) यांच्यासह ​पोलीस प्रशासनातून मेहकर शहर पोलीस निरीक्षक आलेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरांजे व राठोड, तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण कटक, शिवनकर, संदीप भोंडाने, पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद परसुवाले, केशव अवचार आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सरकटे यांनी सहभाग घेतला

दरम्यान रंगेहाथ ​पकडण्यात आलेल्या आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलमे: ६१, ३१५, ३३५, ३३६,​अवैध प्रॅक्टिस कलम: ३३,​पीसीपीएनडीटी (PCPNDT) ॲक्ट कलमे: ३, ६, १८, २३ आणि २५,​बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट कलमे: ४ व ५ नुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहेत.

​या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या आणि बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, परिसरामध्ये या कारवाईचे कौतुक होत आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!