बुलढाणा शहर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध दारू विक्रेत्यांवर छापा, १०,१९० रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील जुनागाव परिसरात चोरून-लपून अवैध गावरान हातभट्टीची दारू तयार करून विकली जात असल्याची, तसेच खामगाव रोडवरील आठवडी बाजार परिसरात अवैध देशी दारूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुलढाणा शहर पोलिसांनी आज सकाळी विशेष मोहीम राबवून एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एकूण १०,१९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ४ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार खामगाव रोडवर सापळा रचून एका आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १७ देशी दारू संत्रा क्वार्टर जप्त करण्यात आल्या. यासोबतच, जुनागाव परिसरात धाड टाकून अवैध गावठी हातभट्टीची दारू विकणाऱ्या तीन आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून एकूण ९० लीटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण ३ अवैध दारू भट्ट्या तोडून उद्ध्वस्त केल्या आहेत.

​सदरची धडक कारवाई बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे (भा.पो.से), अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या आदेशान्वये करण्यात आली.

​बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या थेट मार्गदर्शनाखाली डिबी टीमचे पोलीस उपनिरीक्षक रवि मोरे, पोलीस हेकॉ संदिप कायंदे (ब.नं. ४३५), अनिता अराख (ब.नं. १९३५), पोलीस कॉन्स्टेबल मनोज सोनुने, सुशिल जाधव, विनोद बोरे (ब.नं. ४२५) तसेच आर.सी.पी. पथकातील कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कामगिरी बजावली.

“शहरात कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. अवैध दारू विक्री किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील असणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कायदेशीर कारवाई सुरू राहील.”

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!