डिजिटल मीडिया परिषदेच्या छत्रपती संभाजी नगर येथील अधिवेशनात बुलढाण्याचा डंका

बुलडाणा – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलंग डिजिटल मीडिया परिषद चे छत्रपती संभाजीनगर येथे पहिली राज्यव्यापी अधिवेशन आज दि 14 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.
राज्यभरातून मोठ्या संख्येने पत्रकार बांधव या अधिवेशनाला उपस्थित होते. यामध्ये विशेष म्हणजे डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिला राज्यव्यापी अधिवेशन मध्ये बुलढाणा पत्रकार संघाने डंका वाजविला.
बुलढाणा डिजिटल मीडिया परिषदेच्या विभागीय सचिव जितेंद्र कायस्थ, जिल्हाध्यक्ष गणेश सोळंकी, व सचिव दीपक मोरे यांचा एस एम देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
बुलढाणा मतदारसंघाचे नाव वेळोवेळी या ठिकाणी घेण्यात आले. सर्वाधिक आकडा हा बुलढाणा पत्रकार संघाचा होता. त्यामुळे या अधिवेशन मध्ये बुलढाणा पत्रकार संघाने डंका वाजवीला आहे.




