जळगाव जामोद हत्याकांडात धक्कादायक ट्विस्ट! जी मृत मानली, ती मुलगी पोलिसांसमोर आली जिवंत? 

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: ​बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे काही दिवसांपूर्वी शीर नसलेला एका मुलीचा मृतदेह सापडला होता. या ‘नारकीय’ हत्येचा तपास करताना बुलढाणा एलसीबी पोलिसांनी मध्यप्रदेश राज्याच्या बऱ्हाणपूर जिल्ह्यातील खकणार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मृतक मुलीच्या बापाला आणि भावाला हत्येच्या आरोपाखाली अटक केली होती.

​पण आता या प्रकरणात चित्र उलटले आहे! ज्या मुलीची हत्या झाल्याचे समजून पोलीस तपास करत होते, ती मुलगी चक्क जिवंत असून ती बऱ्हाणपूर पोलिसांसमोर हजर झाली आहे. “मी जिवंत आहे, माझ्या वडिलांना आणि भावाला सोडा,” अशी मागणी तिने केली असून सध्या ती बऱ्हाणपूर पोलिसांच्या ‘सखी वन स्टॉप’ रूममध्ये असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

​आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे.जर ही मुलगी जिवंत आहे, तर जळगाव जामोदला सापडलेला तो छिन्नविच्छिन्न मृतदेह नेमका कोणाचा होता? बुलढाणा पोलिसांचा तपास चुकला की यात आणखी काही गूढ आहे? मात्र मृत मुलीचा आंबी आरोपींचा DNA रिपोर्ट न येताच बुलढाणा पोलिसांनी आरोपींना ताब्यात कसे घेतले असा प्रश्न या माध्यमातून समोर आला आहे..

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!