नांदुरा येथे एलपीजी गॅसचा काळाबाजार उघडकीस; जिल्हा पुरवठा विभागाची धडक कारवाई, १२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

​बुलढाणा: घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा अवैध साठा करून बेकायदेशीररीत्या रिफिलिंग व काळाबाजार करणाऱ्या नांदुऱ्यातील एका अड्ड्यावर जिल्हा पुरवठा विभागाने बुधवारी ३० सप्टेंबर रोजी अचानक धाड टाकली. या कारवाईत गॅस भरलेली टाकी, इलेक्ट्रिक मोटार व वजन काट्यासह एकूण १२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही धडक कारवाई बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी (प्र.) रुपेश विजय बिजेवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

​मिळालेल्या माहितीनुसार, नांदुरा शहरातील ताजनगर परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा गोरखधंदा सुरू असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज,बुधवारी ३० सप्टेंबर रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास अधिकाऱ्यांच्या पथकाने सदर ठिकाणी अचानक छापा टाकला.

​तपासणीदरम्यान शेडमध्ये वजन काट्यावर ठेवलेली गॅसने भरलेली सिलिंडर टाकी आणि दोन नळ्या जोडलेली इलेक्ट्रिक मोटार आढळून आली. या साहित्याचा वापर करून घरगुती सिलिंडरमधून इतर वाहनांमध्ये किंवा छोट्या टाक्यांमध्ये अवैधपणे गॅस भरून काळाबाजार केला जात असल्याचे स्पष्ट झाले.

​जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

​गॅसने भरलेली सिलिंडर टाकी: ₹१,०००/-​इलेक्ट्रिक मोटार (दोन नळ्यांसह): ₹८,०००/- ​इलेक्ट्रॉनिक वजन काटा: ₹२,५००/- ​टूल किट: ₹१,०००/- (एकूण किंमत: ₹१२,५००/-) जप्त करण्यात आला आहे.​कारवाईदरम्यान घटनास्थळावर कोणीही व्यक्ती उपस्थित नव्हती, तसेच जागेचा मालक कोण याबाबतही तत्काळ माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पंचनामा करून सर्व साहित्य जप्त केले. याप्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, सदर प्रकरणाचा पुढील तपास नांदुरा येथील निरीक्षण अधिकारी श्रीमती सुमन एस. कराडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!