पंतप्रधान नरेंद्र मोदी व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या बुलढाण्यात भव्य रक्तदान शिबिर ​भाजप अल्पसंख्याक मोर्चाचा पुढाकार; ‘शिवालय’ कार्यालयात होणार आयोजन

​लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

​बुलढाणा: देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी तसेच महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून बुलढाणा जिल्हा भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने उद्या, २० सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

​सदर रक्तदान शिबिर बुलढाणा येथील भाजप जिल्हाध्यक्ष कार्यालय ‘शिवालय’ येथे आयोजित करण्यात आले आहे. भाजप जिल्हा सचिव मुन्नाभाऊ बेंडवाल आणि अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी समीर खान यांच्या विशेष पुढाकाराने या शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे.

​रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना जीवदान मिळते. या उदात्त हेतूने दोन्ही नेत्यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

​या सामाजिक उपक्रमात बुलढाणा शहर व परिसरातील नागरिक, तरुण वर्ग तसेच भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे जाहीर आवाहन भाजप जिल्हा सचिव मुन्नाभाऊ बेंडवाल आणि समीर खान यांनी केले आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!