बुलढाण्याचे भूमिपुत्र शेख नदीम शेख कासम यांना ‘पोलीस महासंचालक उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर; पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते होणार सन्मान

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा: बुलढाणा पोलीस दलात आपल्या कर्तव्यदक्षतेचा आणि प्रामाणिकपणाचा ठसा उमटवणारे बुलढाण्याचे भूमिपुत्र पोलीस कर्मचारी शेख नदीम शेख कासम यांना महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांचे मानचे ‘उत्कृष्ट सेवा पदक’ (मेडल) जाहीर झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बुलढाणा जिल्हा पोलीस दल व नागरिकांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

​शेख नदीम यांनी आपल्या १७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवा कालावधीत बुलढाणा पोलीस दलासाठी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणणे, अनेक वर्षांपासून चकवा देणाऱ्या फरार आरोपींच्या आवळून मुसक्या बांधणे आणि मिळालेली प्रत्येक जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडणे, यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या याच उत्कृष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण सेवेची दखल घेऊन त्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार गौरव

​हा विशेष सन्मान सोहळा १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या शुभहस्ते शेख नदीम यांना हे पदक प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

​बुलढाण्याच्या सुपुत्राला मिळालेल्या या बहुमानामुळे स्थानिक पोलीस दलाची मान उंचावली असून, शेख नदीम यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकास्पद प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!