उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या बुलढाणा जिल्हा समन्वयकपदी गजानन धांडे यांची नियुक्ती

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक सक्षम आणि मजबूत करण्याच्या उद्देशाने, पक्षाच्या बुलढाणा जिल्हा समन्वयकपदी गजानन धांडे यांची जाहीर नियुक्ती करण्यात आली आहे. रविवार, १२ जुलै रोजी बुलढाणा रेसिडेन्सी येथे पार पडलेल्या पक्षाच्या जिल्हा पदाधिकारी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

​शिवसेना (उबाठा) पक्षाची ही महत्त्वपूर्ण जिल्हा पदाधिकारी बैठक अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाली. या बैठकीला पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, जिल्हाप्रमुख गजानन वाघ, राज्यप्रवक्ता जयश्रीताई शेळके, सहसंपर्कप्रमुख डी. एस. लहाने, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, सहसंपर्क प्रमुख वसंतराव भोजने, जिल्हा संघटक सुमित सरदार, युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे, शुभम पाटील, मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे, तसेच वसंतराव झाल्टे यांच्यासह सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहर प्रमुख व अंतर्गत संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​बैठकीत गजानन धांडे यांच्या नावाची जिल्हा समन्वयक म्हणून घोषणा होताच, उपस्थित पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या निर्णयाचे स्वागत केले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी धांडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आगामी निवडणुकांचा विचार करता, पक्ष विस्तार, संघटना बळकटीकरण आणि विविध आघाड्यांवर समन्वयाची जबाबदारी ते प्रभावीपणे पार पाडतील, असा विश्वास नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.

“पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास मी सार्थ ठरवेन. जिल्हाभरात शिवसेना (उबाठा) पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाला सोबत घेऊन काम करण्याचा माझा निर्धार आहे.”

— गजानन धांडे (नवनियुक्त जिल्हा समन्वयक)

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!