देशावरील संकट टळण्यासाठी ७ वर्षीय माहीराचा ‘पहिला रोजा’; गॅस टंचाई दूर व्हावी म्हणून केली अल्लाहकडे दुआ

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा | सध्या इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या युद्धाचे सावट भारतावरही पडू लागले असून, देशात गॅस सिलेंडरची टंचाई भासत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. अशा कठीण काळात देशावरील हे संकट टळावे आणि सर्वत्र शांतता नांदावी, यासाठी बुलढाण्यातील अवघ्या ७ वर्षांच्या माहीरा शेख या चिमुकलीने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवून अल्लाहकडे साकडे घातले आहे.

​स्थानिक पत्रकार वसीम शेख अनवर यांची कन्या माहीरा शेख हिने पवित्र रमजान महिन्यातील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा २६ वा रोजा (सोमवारी) पूर्ण केला. पहाटे सहेरी करून तिने रोजा धरला आणि दिवसभर अल्लाहची इबादत केली. विशेष म्हणजे, स्वतःसाठी काहीही न मागता तिने आपल्या देशाप्रती असलेल्या प्रेमापोटी अल्लाहकडे विशेष दुआ केली.संध्याकाळी इफ्तारच्या वेळी आपल्या कोवळ्या हाताने दुआ मागताना माहीरा म्हणाली की:
“अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे निर्माण झालेली गॅस सिलेंडरची टंचाई दूर व्हावी आणि माझ्या भारत देशावर कोणतेही संकट येऊ नये.”
​चिमुकल्या माहीराने दाखवलेले हे सामाजिक भान आणि देशप्रेम पाहून बुलढाणेकर भारावून गेले आहेत. सोशल मीडिया आणि परिसरात या ७ वर्षीय चिमुकलीच्या जिद्दीची आणि तिने केलेल्या प्रार्थनेची सध्या मोठी चर्चा होत आहे.

​’त्या’ बहिणीचाच वारसा पुढे चालवला

माहीरा ही अलिजा शेख हिची लहान बहीण आहे. अलिजा देखील काही काळापूर्वी चर्चेत आली होती, जेव्हा तिने रमजानच्या पहिल्याच दिवशी आपला पहिला रोजा ठेवून देशात सर्व धर्मीयांनी गुण्यागोविंदाने राहावे, अशी प्रार्थना केली होती. आता तिची लहान बहीण माहीरा हिने देखील तोच वारसा पुढे चालवत देशहितासाठी प्रार्थना केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!