बुलढाणा शहर पोलिसांची मोठी कारवाई; सराईत घरफोड्या जेरबंद, लाखाचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा शहर पोलिसांकडून तीन गुन्हे उघड; 'मेमरी' नावाचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: शहरातील मलकापूर रोड परिसरात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात बुलढाणा शहर पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून दोन घरफोडी आणि एक मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी एकूण १,०९,१३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

फिर्यादी सचिन शंकर खिल्लारकर (३५, रा. मलकापूर रोड, चोपडा शोरुममागे) हे ३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी एका कार्यक्रमासाठी समता नगर येथे गेले होते. अवघ्या अर्ध्या तासाच्या कालावधीत चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली होती. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१ (३), ३०५ (अ) नुसार गुन्हा (अ.क्र. ९९/२०२६) दाखल करण्यात आला होता.

-​अशी झाली आरोपीला अटक

घरफोडीचा तपास करत असताना ठाणेदार रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गोपनीय बातमीदार आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढली. तपासादरम्यान संशयास्पद हालचालींवरून शेख अरबाज ऊर्फ मेमरी शेख मेहमुद (२५, रा. जोहर नगर, बुलढाणा, ह.मु. भादोला) याच्यावर पाळत ठेवली गेली. तो खामगाव रोडने येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

-​जप्त केलेला मुद्देमाल-

आरोपीकडून पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे: नगदी रक्कम: ३१,५०० रुपये,​चांदीच्या वस्तू: ३२,६३० रुपये,​मोबाईल: ५,००० रुपये
​गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल: ४०,००० रुपये असे ​एकूण किंमत: १,०९,१३० रुपये

-​उघड झालेले गुन्हे-

आरोपी ‘मेमरी’ याच्याकडून बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमधील तीन महत्त्वाचे गुन्हे उघड झाले आहेत. यामध्ये दोन घरफोड्या (अप क्र. ९९/२६ व ८५/२६) आणि एका मोटारसायकल चोरीचा (अप क्र. १२३९/२५) समावेश आहे.

-​यांनी केली कारवाई-

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रवी राठोड, पोउपनि रवी मोरे, पोहेकॉ संदीप कायंदे, अनिता अराख, पोकॉ विशाल बनकर आणि विनोद बोरे यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि रवी मोरे करत आहेत.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!