बुलढाणा शहर पोलिसांकडून हरविलेले 54 मोबाईल हस्तगत; मुळ मालकांना मोबाईल केले परत..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा : बुलढाणा शहर पोलीस स्टेशन हद्दीत हरविलेले एकूण 54 मोबाईल फोन शोधून काढत ते मुळ मालकांना परत देण्यात बुलढाणा शहर पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई CENTRAL EQUIPMENT IDENTITY REGISTER (CEIR) या केंद्र शासनाच्या पोर्टलच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
बुलढाणा शहर पोलिसांनी मागील महिन्यात CEIR पोर्टलचा प्रभावी वापर करत 38 मोबाईल हँडसेट, तसेच तपासाअंती 16 मोबाईल हँडसेट हस्तगत केले. विविध कंपन्यांचे हे एकूण 54 मोबाईल हँडसेट अंदाजे 10 लाख रुपये किमतीचे असल्याचे सांगण्यात आले. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलचे मुळ मालक शोधून त्यांच्या मालकी हक्काची खात्री केल्यानंतर, हे मोबाईल विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र, पोलीस अधीक्षक बुलढाणा निलेश तांबे,अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणीक लोढा,अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड, मा. प्रो. आयपीएस आदित्य सिंग, बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील तसेच ठाणेदार रवी राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत मुळ मालकांना सुपूर्द करण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे,अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत पोलीस स्टेशन बुलढाणा शहरचे ठाणेदार रवी राठोड यांच्या नेतृत्वाखाली CEIR पोर्टलचे काम पाहणारे पोउपनि. रवि मोरे, पोकॉ. युवराज शिंदे, पो.कॉ. दीपक चव्हाण, पोकॉ. विनोद बोरे, पो.कॉ. मनोज सोनुने तसेच महिला पोलीस अंमलदार मपोकॉ. मोहिनी चव्हाण यांनी मोलाची कामगिरी बजावली.हरविलेले मोबाईल शोधून मुळ मालकांना परत मिळाल्याने नागरिकांनी बुलढाणा शहर पोलिसांचे आभार मानले.




