दुर्दैवी: बुलढाण्याचे मनमिळाऊ व्यक्तिमत्व कलीम खान ‘बंदूकवाले’ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन,;जिल्ह्यात शोककळा

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा:बुलढाणा जिल्ह्यातील एक परिचित व्यक्तिमत्व आणि अनेकांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रास्त्रांचा परवाना मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणारे कलीम खान गुलशेर खान (५८), ऊर्फ ‘कलीम खान बंदूकवाले’ यांचे आज रविवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या या अकाली जाण्याने बुलढाणा शहरासह ढालसावंगी, धाड आणि रायपूर परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कलीम खान हे आज रविवारी दुपारी राजूर येथील एका जेवणाच्या पार्टीसाठी गेले होते. ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचतांना ते अचानक जागीच कोसळले. उपस्थित मित्रांनी आणि नातेवाईकांनी वेळ न घालवता त्यांना तातडीने बुलढाणा शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये हलवले.

उपचारासाठी धावपळ, पण काळाचा घाला

कलीम खान यांना वाचवण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील तीन ते चार खासगी रुग्णालयांमध्ये धाव घेतली. मात्र, रविवार सुटीचा दिवस असल्याने अनेक ठिकाणी डॉक्टर उपलब्ध होऊ शकले नाहीत. अखेर त्यांना डॉ. सौरभ संचेती यांच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

मनमिळाऊ व्यक्तिमत्व हरपले

अंदाजे ५८ वर्षांचे असलेल्या कलीम खान यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ आणि मदतीला धावून जाणारा होता. शस्त्रास्त्रांच्या व्यवसायासोबतच सामाजिक वर्तुळातही त्यांचा मोठा राबता होता. प्रशासकीय कामात आणि परवाना प्रक्रियेत अनेकांना मदत केल्यामुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला होता. त्यांच्या निधनाची बातमी समजताच बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार असून, एका उमद्या आणि मनमिळाऊ व्यक्तीच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!