’स्वरविहार’ संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेत दैदिप्यमान यश; गायन विषयात अलिजा शेख प्रथम श्रेणीत
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचा निकाल घोषित; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा संगीतात डंका

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई अंतर्गत नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ या सत्राचा संगीत विषयाचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत बुलढाण्यातील स्वरविहार संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुरेल कामगिरीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या परीक्षेत यश मिळवून संगीताप्रती असलेली आपली ओढ सिद्ध केली आहे.
गायन व वादन क्षेत्रात ‘प्रथम श्रेणी’चा दबदबा
हार्मोनियम विषयात प्रसेनजित मोरे याने प्रथम श्रेणीत यश मिळवले. गायन विषयात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव, साहित्यिक डॉ. मंजुश्री खोब्रागडे, आरोग्य विस्तार अधिकारी शरद कुमार ठाकूर, ॲड. अमोल देशपांडे, राजश्री उबाळे, लक्ष्मी सुरोशे, प्रभावती करे, अन्वी गाडेकर, अलिजा शेख, आर्यन सरोदे आणि विहान गवई यांनी प्रथम श्रेणीत बाजी मारली.
प्रवेशिका व मध्यमा परीक्षेतही यश
प्रवेशिका प्रथम (गायन): सहाय्यक आयुक्त गजानन घिरके, रेवा सोनुने, आचल सुरडकर, सायली चव्हाण, लताताई गुर्जर, शैलाताई हिवाळे (सर्व प्रथम श्रेणी).
प्रवेशिका पूर्ण: अभय झनके, अनया डोंगरे, नीलम श्रीवास्तव, दिया मेमाणे, प्रणिका जाधव (गायन – प्रथम श्रेणी) तर प्रणश्री पडोळ (सिंथेसायझर – प्रथम श्रेणी).
मध्यमा: मध्यमा पूर्ण परीक्षेत शिल्पा डाबेराव (प्रथम श्रेणी) तर सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. गजेंद्र निकम यांनी द्वितीय श्रेणी मिळवली. सिंथेसायझरमध्ये अनय डाबेराव याने यश संपादन केले.
तबला वादनात ‘विशेष योग्यता’ श्रेणी
तबला विषयात गणराज देवकर याने प्रवेशिका पूर्ण परीक्षेत ‘विशेष योग्यता’ (Distinction) मिळवून विद्यालयाचे नाव उंचावले. याव्यतिरिक्त रुद्रायन गाढे, राम निर्मळ, प्रत्युश जाधव, प्रानद वैराळकर व श्रेयस इंगळे यांनी प्रथम श्रेणी मिळवली. विवान पालकर, रुद्र नरोटे, विश्वजित राजपूत, डॉ. मिलिंद जाधव, साईप्रसाद सपकाळ, हर्षराज पडोळ, नील खेडेकर, स्वरोम सराफ यांनीही विविध श्रेणींमध्ये यश प्राप्त केले.
मान्यवरांकडून कौतुक
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना स्वरविहार संगीत विद्यालयाचे संचालक प्रा. रविकिरण मोरे व प्रा. अमोल दिशागज यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल बुलढाण्यातील कला व संगीत क्षेत्रातील मान्यवरांकडून विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.




