बुलढाण्यातील राजकारणात स्वतःची पहिली 2 कोटी पेक्षा जास्त किमतीची “डिफेन्डर” दाखल,उद्या होणार जलवा…

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: मागील काळात एकमेकांना वर मोठे आरोप-प्रत्यारोप झाले होते,त्याचे कारण होते,महागळी कार “डिफेन्डर”,मात्र ही डिफेन्डर माझी नसून माझ्या नातेवाईकांची असल्याचा खुलासा झाला होता,मात्र आत्ता पुन्हा महागळी “डिफेन्डर” कार चर्चेत आली आहे,ती म्हणजे उद्धव बाळासाहेब शिवसेनेचे मेहकर नगर परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष किशोर भाऊ गारोळे यांच्यामुळे,किशोर भाऊ गारोळे यांनी जवळपास 2 कोटी 15 लाख रुपय किंमतीची पांढरी रंगाची “डिफेन्डर” कार विकत घेतली आहे आणि ती मेहकरात दाखल देखील झाली आहे. उद्या सोमवारी 5 जानेवारीला किशोर भाऊ गारोळे यांचा मेहकर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा शपथविधी असून ते कारभार सांभाळणार आहे,याच आपल्या पांढऱ्या रंगाच्या “डिफेन्डर” कारमध्ये बसून आपल्या राहत्या घरापासून सकाळी 9:30 वाजता मेहकर नगर परिषदेत दाखल होणार आहे,आणि नगराध्यक्ष पदाची शपथविधी करून ते कारभार सांभाळणार आहे.यावेळी जवळपास 2 कोटी 15 लाख रुपय किंमतीची किशोर भाऊ गारोळे यांची स्वतःची “डिफेन्डर” कारचा मेहकर मध्ये उद्या सोमवारी “जलवा”होणार आहे.




