रिल बनवतांना युवकाच्या डोक्याला रेल्वेचा जबर फटका बसल्याने मृत्यू..

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
शेगाव: रेल्वे लाईनवर उभे राहून रिल बनवतांना एका युवकाच्या डोक्याला रेल्वेचा जबर फटका बसल्याने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 4 वाजता सुमारास घडली. मृतकाचे नाव शे.नदीम शे.रफिक असून तो खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील रहिवासी असल्याचे समजते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मृतक शे.नदीम शे.रफिक हा आज दुपारी तालुक्यातील आळसणा गावात लग्नाच्या रिसेप्शनच्या कार्यक्रमात आला होता. त्यावेळी दुपारी 4 वाजता सुमारास त्याला आळसणा गावालगत असलेल्या रेल्वेलाईनवर रिल बनविण्याचा मोह सुटला आणि ते रिल बनविण्यासाठी रेल्वेलाईनवर पोहचला यावेळी त्याचा लहान भाऊ सुद्धा त्याच्या सोबत होता. दरम्यान येणाऱ्या रेल्वे जवळ रिल बनविण्यात मग्न असल्याने त्याच्या जवळ रेल्वे जवळ येताच यावेळी रेल्वेचा त्याच्या डोक्याला जबर फटका बसला आणि शे.नदीम हा खाली कोसळला यावेळी त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेची वार्ता वार्यासारखी पसरताच समाजमन सुन्न झाले असून नदीमच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.




