पत्रकार इंद्रिस शेख याना पितृशोक

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: दै. विदर्भ दत्तक या वृत्तपत्राचे संपादक इंद्रिस शेख यांचे वडिल शेख नजीर शेख बुढन यांचे आज 1 ऑक्टोबरच्या मध्यरात्री बुलढाण्याच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान आजाराने निधन झाले आहे. ते  72 वर्षाचे होते.त्यांचा दफनविधीचा कार्यक्रम आज 1 ऑक्टोबर रोजी जोहरच्या नमाज नंतर (दुपारी 2 वाजता) ते राहत असलेल्या गावी देऊळघाट येथील कब्रस्थान येथे होणार आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून शेख नजीर शेख बुढन वय 72 यांची प्रकृती खालावली होती. काल मंगळवारी रात्रीच्या दरम्यान त्यांना उपचरासाठी बुलढाण्याच्या एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते,मात्र रात्रीच्या वेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.शेख नजीर शेख बुढन हे मनमिळावू व सगळ्यांना जीव लावणारे स्वभावाचे असल्याने ते देऊळघाट मध्ये सगळ्यांचे चाहते होते,त्यांच्या निधनाने देऊळघाट गावात दुःखाची शोककळा पसरली आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!