खडकपूर्णा प्रकल्पाचे 19 तर पेनटाकळी धरणाचे 4 दरवाजे उघडले

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेला खडकपूर्णा प्रकल्प काल पासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तुडूंब भरला  आहे म्हणजेच 100 टक्के भरला आहे.प्रकल्पाचे  50 सेमीने एकुण 19 दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रात 1326.96 घ.मी. विसर्ग सोडण्यात आले आहे.शिवाय मेहकर तालुक्यातील पेनटाकळी धरणाचेही चार दरवाजे अती पावसामुळे उघडण्यात आले आहेत.खडकपूर्णा प्रकल्प,पूर नियंत्रण कक्ष व देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी खडकपूर्णा प्रकल्पाच्या नदीकाठच्या 33 गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे व पेनटाकळी धरणाच्या काठच्या गावांनाही सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

खडकपूर्णा प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी 520.50 असून 93.4040 दलघमी संकल्पित साठा आहे.सद्यस्थितीत 520.500 मी. एवढी पाणी पातळी असून, आजचा 93.404 दलघमी एवढा उपयुक्त साठा आहे. प्रकल्प क्षेत्रात 42 मिमी पाऊस झाल्याने प्रकल्प 100% भरला,परिणामी खडकपूर्णा प्रकल्पाचे 19 दरवाजे 50 सेमीने  उघडण्यात आले आहे. दरम्यान 1326.96 घमीने 46854.96 क्यूसेक नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.प्रकल्पातील पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.आहे.शिवाय मेहकर तालुक्यातील पेनटाकळी धरणाचेही चार दरवाजेही उघडण्यात आले आहेत.खडकपूर्णा प्रकल्प,पूर नियंत्रण कक्ष व देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी खडकपूर्णा प्रकल्पाच्या नदीकाठच्या 33 गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे व पेनटाकळी धरणाच्या काठच्या गावांनाही सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!