शेलोडी कारवाईचे पडसाद: खामगाव ग्रामीणचे निरीक्षक तावडे नियंत्रण कक्षात, तर दोन कर्मचारी मुख्यालयी अटॅच

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा: शेलोडी रोडवरील अवैध वेश्या व्यवसायावर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या धडक कारवाईचे आता प्रशासकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकरणात कर्तव्यदक्षता आणि कार्यपद्धतीचा ठपका ठेवत, खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक तावडे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे, तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बुलढाणा पोलीस मुख्यालयी ‘अटॅच’ करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी शेलोडी रोड परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर आयपीएस आदित्यकुमार सिंग यांच्या पथकाने अचानक छापा टाकून मोठी कारवाई केली होती. या कारवाईत महिला आणि पुरुषांना ताब्यात घेण्यात आले होते. या अवैध धंद्यांमुळे स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त होते आणि वारंवार तक्रार करूनही स्थानिक पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा होती.

जिल्हा पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांचा दणका

जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे (आयपीएस) यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा संशय आणि अवैध धंद्यांना मिळणारे अभय यामुळे ही प्रशासकीय कारवाई करण्यात आल्याचे समजते. या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली असून, अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या या भूमिकेचे स्थानिक ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!