बुलढाणा शहरात शिवप्रेमींचा एल्गार! चिखला काकड घटनेच्या निषेधार्थ संगम चौकातील शिव स्मारक समोर जोरदार निदर्शने

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादात महिलांना करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीचे पडसाद आता जिल्हाभरात उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज, २३ फेब्रुवारी रोजी बुलढाणा शहरातील संगम चौक येथील शिवस्मारक परिसरात शेकडो शिवप्रेमींनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.संगम चौकात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवप्रेमींनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून चिखला गावातील पुतळा सन्मानाने तिथेच ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, “राष्ट्रमाता जिजाऊंच्या जिल्ह्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न होणे आणि तो रोखणाऱ्या संजीवनी वाघ यांच्यासारख्या भगिनीवर हल्ला करून तिचे कपडे फाडले जाणे, ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे.” काही समाजकंटक जाणीवपूर्वक सामाजिक आणि धार्मिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.संगम चौकात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवप्रेमींनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून चिखला गावातील पुतळा सन्मानाने तिथेच ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.




