शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: कोलवड येथील एका शेतकऱ्याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने जखमी करून फरार झालेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांच्या पथकाने अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पो.स्टे. बुलढाणा शहर अप.क्र. 9/26 अन्वये भा.न्या.सं. 2023 चे कलम 109(1), 115(2), 352, 351(3), 3(5) अंतर्गत दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला होता.
दि. 20 जानेवारी 2026 रोजी गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी नामे
सुरज मोतीराम पसरटे (वय 23, रा. विजयनगर, सुंदरखेड, ता. जि. बुलढाणा)
आदेश सुनील राठोड (वय 22, रा. क्रीडा संकुल रोड, आय.टी.आय. कॉलनी, बुलढाणा) हे पुणे शहरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने वाघोली परिसरातील अक्षय संस्कृती अपार्टमेंट, बाईफ रोड, वाघोली, पुणे येथे छापा टाकून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्यांना पो.स्टे. बुलढाणा शहर येथे हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात पार पडली. पथकात पोउपनि. अविनाश जायभाये यांच्यासह पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, चाँद शेख, गणेश पाटील, पोकों गजानन गोरले, चापोकों निवृत्ती पुंड तसेच TAW चे पोहेकॉ राजू आडवे व पवन मखमले यांचा समावेश होता.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!