शिवसेनेच्या मुस्लिम या नगरसेविकाच्या पतीने व्हाट्सप स्टेट्सद्वारे केली राजीनामा देणार असल्याची घोषणा,घोषनेने एकच खळबळ…

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: बुलढाण्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे.निवडणून आलेल्या शिवसेनेच्या मुस्लिम महिला नगरसेविकाच्या पतीने आम्ही आमच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे.येत्या 16 जानेवारी शुक्रवारीला आम्ही राजीनामा देणार आहे.ही घोषणा त्यांनी आपल्या स्वतःच्या नंबरच्या व्हाट्सपच्या स्टेट्सद्वारे सोमवारी रात्री केली आहे.या स्टेट्स मध्ये त्यांनी सगळ्या प्रभागातील नागरिकांनी राजीनामा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यावे असा आवाहन देखील केला आहे.यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.राजीनामा देण्याची घोषणा करणाऱ्या नगरसेविका पतीचे नाव मोहम्मद अजहर असून आत्ताच त्यांच्या पत्नी प्रभाग क्र 2 ‘ब’ च्या मिर्झा नगर,इकबाल नगर,जोहर नगर या प्रभागातून शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या आहे.

2 डिसेंबर ला झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत बुलढाणा विधानसभेचे शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी सूक्ष्म नियोजन व सर्व हतकंडे वापरून बुलढाणा नगर परिषदेवर आपला वर्चस्व कायम केला आहे.नगराध्यक्ष मिळवून 31 नगरसेवक पैकी 30 नगरसेवक-नगरसेविका आपल्या कडे ओढून घेतला आहे.प्रभाग क्र.2 ‘ब’ च्या मुस्लिम बहुल मधून मोहम्मद अजहर यांच्या पत्नी इशरत परवीन मोहम्मद अजहर ह्या शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर 1048 मतांनी विजयी झाल्या आहे.प्रभाग क्र.2 ‘ब’ मधून सत्ताधारी आमदार असलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका निवडून आणल्याने आपल्या मुस्लिम बहुल परिसरात आत्ता विकास होईल अशा नागरिकांच्या ‘आशा’ पल्लवित झाल्या आहे.मात्र नगरसेवक पदभाराची विनिग सुरू होण्याच्या अगोदरच शिवसेनेच्या नगरसेविका यांचे पती मोहम्मद अजहर यांनी आपल्या व्हाट्सप स्टेट्सद्वारे आपल्या पत्नीचा नगरसेविका पदावरून राजीनामा दिल्याची घोषणा केल्याने प्रभाग क्र 2 नागरिकांमध्ये आणि राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.मोहम्मद अजहर यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केल्यामागचे कारण समोर आले नाही,मात्र राजीनामा नाराजीमुळे देत आहे की,अन्य कारणाने आत्ता तेच आपली भूमिका समोर आणणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

-राजीनामाचा स्टेट्स ठेवताच काही सेकंदात धनुष्यबाणचा डीपी देखील केला रिमूव्ह-

निवडणूक काळात अथवा निवडून आल्यानंतर प्रभाग क्र 2 ‘ब’ च्या नगरसेविका यांचे पती मोहम्मद अजहर यांनी आपल्या मोबाईल नंबरच्या स्टेट्सवर शिवसेनेचे “धनुष्यबाण” लोगोचा ‘डीपी’ लावलेला आहे, मात्र काल सोमवारी च्या रात्री नगरसेविका पदापासून राजीनामा देण्याची आपल्या वॉट्सपच्या स्टेट्सद्वारे घोषणा केल्यानंतर काही मिनिटातच मोहम्मद अजहर यांनी आपल्या वॉट्सपच्या “डीपी” वरचा धनुष्यबाणचा लोगो देखील काढून टाकला आहे.यामुळे मोहम्मद अजहर हे शिवसेना पक्षा पासून किंवा आ.संजय गायकवाड यांच्या कार्यप्रणाली पासून नाराज असल्याची चर्चा रंगतेय..

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!