जन्मोत्सवाच्या पर्वावर जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मस्थळावर शासकीय महापूजा….

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा ४२८ जन्मोत्सव सोहळा आज सोमवारी १२ जानेवारीला देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. माँसाहेब जिजाऊ यांचा जन्मस्थळ असलेला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथेही राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व थाटात साजरा करण्यात येत आहे.
राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाडा स्थित माँ जिजाऊंच्या जन्मस्थळावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव व राजश्रीताई जाधव यांच्या हस्ते शासकीय महापूजा करून माँ जिजाऊ साहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार राजेंद्र शिंगणे,माजी आमदार शशिकांत खेडेकर व राज्यभरातून आलेले जिजाऊंभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.




