जिल्हा पत्रकार संघातर्फे 6 जानेवारीला पत्रकार दिनानिमित्त आरोग्य शिबिर…

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले होते. पत्रकार दिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही बुलढाणा जिल्हा पत्रकार संघातर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुलढाणा येथील पत्रकार भवन परिसरात ६ जानेवारीला पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य शिबिर पार पडणार आहे. पत्रकार हा समाजाचा अत्यंत महत्त्वाचा एक घटक असून सामाजिक स्वास्थ्य संभाळण्याचे काम ते करतात. मात्र असे असताना, हा त्यांचा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पत्रकारांचे आरोग्य सुदृढ राहावे, या हेतूने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, पत्रकार तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीत सिंग राजपूत यांनी केले आहे.




