उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये तीन दिवसीय वार्षिक सामाजिक-सांस्कृतिक गॅदरिंगचा समारोप

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाण्यातील उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, येथे 31 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 या कालावधीत तीन दिवसीय वार्षिक सामाजिक-सांस्कृतिक गॅदरिंग अत्यंत उत्साहात व रंगतदार कार्यक्रमांच्या माध्यमातून संपन्न झाली.
या गॅदरिंगचे उद्घाटन शाळा समितीचे अध्यक्ष अब्दुल रहीम सेठ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शाळा समितीचे सदस्य अब्दुल हमीद सेठ, झिकरिया सेठ, सचिव सैयद यासीन, अब्दुल मसूद बाबू तसेच प्राचार्य मोहम्मद सलीम उपस्थित होते.
या गॅदरिंगदरम्यान मान्यवर पाहुणे आमदार संजय गायकवाड व त्यांची पत्नी नवनिर्वाचित नगर परिषद अध्यक्षा पूजा ताई गायकवाड यांचे शाल-श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच बुलढाणा नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवकांचेही यावेळी स्वागत करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य मोहम्मद सलीम, सहाय्यक मुख्याध्यापक सैयद दाऊद , पर्यवेक्षक सैयद यासर, ज्युनिअर कॉलेज, हायस्कूल, प्राथमिक व के.जी. विभागातील सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा वार्षिक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.




