बुलढाणा नगर परिषदेच्या गटनेतेपदी मृत्युंजय संजय गायकवाड, विरोधी पक्षाचेही नगरसेवक शिवसेनेच्या गटात सामील..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा नगर परिषदेच्या गटनेतेपदी आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र मृत्युंजय संजय गायकवाड यांची ३१ पैकी ३० नगरसेवकांच्या स्पष्ट बहुमताने निवड करण्यात आली,विशेष म्हणजे कॉग्रेसचे २,शरद पवार राष्ट्रवादीचे २ आणि भाजपचे एका नगरसेवक देखील शिवसेनेच्या गटात शामील झाले आहेत.
१ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या बैठकीत ही निवड सर्वानुमते करण्यात आली.आमदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेमध्ये पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कारभार करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन बुलढाणा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील, अशा भावना यावेळी मृत्युंजय गायकवाड यांनी व्यक्त केल्या आहेत.




