विजयी मिरवणुकीत गुलाल तर उधळले, मात्र कोण करणार साफ?..मुस्लिमांनीही मिरवणुकीत उघळले गुलाल..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा नगर परिषदेचे 2 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर झाला,या निकालात आमदार संजय गायकवाड यांच्या बाजुने शहर वासीयांनी कौल दिला. 22 शिवसेनेचे नगरसेवक तर नगराध्यक्ष पदी आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजाताई संजय गायकवाड ह्या विजयी झाल्या. विजय घोषित झाल्यानंतर अनेक नगरसेवकांनी आप-आपल्या प्रभागात विजयी मिरवणुकी काढण्यात येऊन जल्लोष करण्यात आला.या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गुलाल उधळण्यात आले, शिवाय नगराध्यक्ष विजयी मिरवणुकीत देखील शहरातील मुख्य-मुख्य मार्गाहून काढण्यात आली,यात देखील मोठा जल्लोष करीत करून मोठ्या प्रमाणात गुलाल उधळण्यात आले.व विजयी मिरवणुक होवून दोन दिवस उलटले, तरी देखील आज देखील अनेक प्रभागात व शहरातील मुख्य चौकात रस्त्यावर गुलाल पडून आहे.रस्त्यावर पडलेले या गुलालाची अद्यापर्यंत बुलढाणा नगर परिषदेकडून साफसफाई करण्यात आली नाही,याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे.अनेक नागरीकांच्या दुचाकीवर व अंगावर हवेच्या माध्यमातून गुलाल उडत आहे.यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. म्हणून विजयी मिरवणुकीत गुलाल तर उधळला, साफ कोण करणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
महत्वाचे म्हणजे,मुस्लिम समाजामध्ये गुलाल उघळणे चालत नाही,अनेक वेळा तर अंगावर गुलाल पडलं किंवा अंगावर गुलाल पडल्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघळू नये म्हणून पोलीस प्रशासनाला खबरदारी घ्यावी लागते,मात्र यंदाच्या बुलढाणा नगर परिषदेच्या निवडणूकीत आलेल्या निकालामुळे विजयी मुस्लिम उमेदवारांच्या प्रभागात मिरवणुकी काढण्यात आल्या या मिरवणुकीतही गुलाल देखील उधळण्यात आले,याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.शिवाय मुस्लिम प्रभागात देखील रस्तावर गुलाल पडून आहे.त्याची देखील साफसफाई करण्यात आली नाही..




