प्रतिबंधीत मांजाचा वापर चालणार नाही, पोलीस अधिक्षक निलेश तांबेंचा कारवाईचा इशारा

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क..
बुलढाणा: मकरसंक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रतिबंधीत नायलॉन, चायनीज व रसायनयुक्त मांजाचा वापर वाढण्याची शक्यता असून, अशा हानीकारक मांजाविरोधात पोलिस प्रशासन आक्रमक झाले आहे. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला असून, “प्रतिबंधीत मांजाचा वापर, विक्री, साठवणूक,वाहतूक चालणार नाही, त्यांच्यासोबत कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
यापूर्वी नायलॉन व चायनीज मांजामुळे निष्पाप नागरिकांचे गळे चिरले जाणे, दुचाकीस्वार गंभीर जखमी होणे, तसेच असंख्य पक्षी व प्राण्यांचे बळी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही काही विक्रेते व बेफिकीर नागरिक जीवाशी खेळत असल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात येत आहे. शासनाने या मांजावर पूर्णतः बंदी घातलेली असतानाही नियम धाब्यावर बसवले जात असल्याने आता पोलिसांचा संयम सुटलेला दिसत आहे.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांत विशेष पथके तैनात करण्यात आली असून, प्रतिबंधीत मांजा आढळून आल्यास संबंधितांवर भारतीय न्याय संहितेनुसार कठोर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. पोलिसांनी नागरिकांनाही जबाबदारीची जाणीव करून देत, “माहिती लपवू नका, तत्काळ पोलिसांना कळवा, असे आवाहन केले आहे. सण साजरा करा, पण जीवघेण्या मांजाला थारा देऊ नका अन्यथा कारवाई अटळ आहे




