पाचही जिल्ह्यातील लाखो नागरिकांची तब्लिकी इस्तेमाला हजेरी,सामूहिक दुआ ने इस्तेमाचे समारोप..

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा: बुलढाणा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भादोला गावाजवळ 13 डिसेंबर पासून तीन दिवसीय तब्लिक इस्तेमा सुरू होते. या इस्तमाचे आज सोमवारी 15 डिसेंबरला सामूहिक दुआने समारोप झाले. बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यातून लाखो नागरिकांनी या तब्लिक इस्तेमामध्ये आपली हजेरी लावली होती.आयोजक आणि पोलीस प्रशासनाकडून उत्तम नियोजन केल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडले नाही.

गेल्या एक ते दीड महिन्यापासून बुलढाणा जवळील भादोला गावाजवळ जवळपास 100 एकर शेतामध्ये तब्लिक इस्तेमाच्या आयोजनासाठी तयारी करण्यात येत होती,तयारीसाठी हजारो मुस्लिम युवकांनी मोफतमध्ये आपली सेवा दिली आहे.तीन दिवसीय इस्तेमामध्ये माणुसकीचा धर्म कसा पाळावा, माणसाने माणसाशी कसे वागावे यासह पवित्र कुराणमधील आकाए नामदार हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम यांनी दिलेले उपदेश मौलवीं उलमांनी मुस्लिम बांधवांना सांगितले, या तीन दिवसीय तब्लिक इस्तेमामध्ये पाच वेळची नमाज पठण देखील करण्यात आली.या इस्तेमामध्ये चांगल्या प्रमाणत स्वच्छता ठेवण्यात आली.आज सोमवारी 15 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सामूहिक दुआने इस्तेमाचे समारोप झाले,समारोप नंतर मुस्लिम युवकांनी व पोलिसांनी उत्तम नियोजन केल्यामुळे लाखोंच्या संख्येत नागरिक आल्यानंतरही बुलढाणा-खांमगाव रस्त्यावर कोठेही वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले नाही.इस्तेमामध्ये वाहतूक असो की,पोलीस बंदोबस असो यासाठी मुस्लिम युवकांसोबत जिल्हा पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील,बुलढाणा शहर ठाणेदार रवी राठीड,ग्रामीम ठाणेदार गजानन काबंळे,जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक काकवीपुरे, जिल्हा वाहतूक शाखेचे उप पोलीस निरीक्षक अनिल भुसारी यांच्यासह असंख पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली चोखपणे जबाबदारी पार पडली..

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!