अनंता शंकर शिंदे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: नुकत्याच भाजपमधून शिवसेनेत गेलेले अनंत शंकर शिंदे यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे भारतीय न्याय संहिता कलम 75 (2), 296 तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
बुलढाणा येथील न्यायालयात एडवोकेट अजय दिनोदे यांच्यामार्फत अनंत शिंदे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणांमध्ये न्यायालयाने आरोपी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अंतरिम जामीन मंजूर केला आहे. एडवोकेट अजय दिनोदे यांना एडवोकेट रोहित दिनोदे एडवोकेट अबूजर अन्सारी एडवोकेट प्रियेश चौधरी यांनी सहकार्य केले




