आमदार संजय गायकवाड यांना बंधुशोक◾मुरलीधर गायकवाड यांचे निधन

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांचे मोठे बंधू मुरलीधर रामभाऊ गायकवाड यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. बुलढाणा एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेले मुरलीधर गायकवाड यांचे मृत्यूसमयी वय 75 वर्षे होते. त्यांच्या पश्चात भाऊ, पुतणे, मुली, जावई आणि नातवंडांचा मोठा परिवार आहे. आज, सोमवार 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता इकबाल चौक हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. मलकापूर रोडवरील गणेश नगर येथील त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघेल.




